देवरुख : रत्नागिरी जिल्हा खो-खो असोसिएशन व संगमेश्वर तालुका खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हा जोड जिल्ह्यास्तरीय पुरुष खुला गट व १४ वर्षे वयोगट मुलगे खो-खो स्पर्धेचे आयोजन २ ते ३ जानेवारी या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धा सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ सोनवडे संचलित सोनवडे माध्यमिक विद्यालय व आजी-माजी विद्यार्थी माध्यमिक विद्यालय सोनवडे यांच्यातर्फे आयोजित केल्या आहेत. दोन गटांमध्ये होणाऱ्या या खो-खो स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी या दोन जिल्ह्यातील संघ सहभागी होणार आहेत.
सोनवडे माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर शुक्रवारी दुपारी ३ वाजता या स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. लहान गट मुलगे स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला ६ हजार २५ रुपये, द्वितीय क्रमांक ४ हजार २५ रुपये, तृतीय क्रमांक २ हजार २५ रुपये आणि चतुर्थ क्रमांकास १ हजार २५ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
तसेच पुरुष खुला गट स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला ११ हजार २५ रुपये, द्वितीय क्रमांक ८ हजार २५ रुपये, तृतीय क्रमांक ५ हजार २५ रुपये आणि चतुर्थ क्रमांकास ३ हजार २५ रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविले जाणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 01/Jan/2026














