लांजा : वेरवली पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय आणि यामाहा ट्रेनिंग स्कूल शैक्षणिक संकुलाचा नामकरण सोहळा उत्साहात पार पडला. रोहिणी डोळस यांच्याहस्ते मुख्य कोनशिलेचे अनावरण करण्यात आले.
यावेळी उद्योजक गिरिष कोळवणकर, चितळे उद्योग समूहाचे संचालक विश्वास चितळे, इन्फिगो लाईफ सायन्सचे संस्थापक डॉ. श्रीधर ठाकूर, वेरवली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मारुती डोळस उपस्थित होते. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नाम फलकाचे अनावरण ज्येष्ठ समाजसेवक उद्योजक रवींद्र (अण्णा) सामंत, तर सांस्कृतिक भवनाचे अनावरण विश्वास चितळे यांनी केले. प्रास्ताविक संस्था संचालक अमोल रेडीज, सूत्रसंचालन विनोद बंडगर, तर आभार प्रदर्शन सचिन कांबळे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:01 PM 01/Jan/2026














