Dapoli : कोळबांद्रे मार्गावर दुतर्फा झाडीमुळे अपघाताचा धोका वाढला

दापोली : तालुक्यातील कोळबांद्रेकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडी वाढली आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. वाढलेल्या झाडीमुळे वळणांवर दृश्यता कमी झाली आहे. वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अलीकडील काळात या मार्गावर काही किरकोळ अपघात घडल्याच्या घटना घडल्या असून रस्ता वाहनांसाठी सुरक्षित राहिलेला नाही. स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून संबंधित विभागाने तातडीने झाडी छाटावी, अशी मागणी होत आहे. मात्र, या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.

संभाव्य अपघात टाळण्यासाठी रस्त्याची सुरक्षितता राखण्यासाठी संबंधित विभागाने तत्काळ कारवाई करून रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडी साफ करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 06/Jan/2026