Ratnagiri : जिल्ह्यात फेब्रुवारीसाठी तालुकानिहाय धान्यसाठ्याचे वितरण

रत्नागिरी : फेब्रुवारीसाठी जिल्ह्यातील ९ लाख ९३ हजार २४४ प्राधान्य कार्डधारक सदस्यांकरिता प्राधान्य तांदूळ २५५९.५० मे.टन व गहू १८६२ मे. टन नियतनाची भारतीय अन्न महामंडळ पनवेल यांच्याकडून प्राधान्यची उचल करण्यात आली आहे. फेब्रुवारीसाठी मंडणगड तालुक्यात ४० हजार ७७८ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी ११९.५० मे. टन तांदूळ व ८१ मे. टन गहू, दापोली तालुक्यात १ लाख १६ हजार ८९१ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी २९४.५० मे. टन तांदूळ व २१६.५० मे. टन गहू, खेड तालुक्यात १ लाख १२ हजार ९९३ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी २४८.५० मे.टन तांदूळ व २२२.५० मे. टन गहू, गुहागर तालुक्यात ७४ हजार ५४६ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी २१२.५० मे. टन तांदूळ व १३८ मे. टन गहू, चिपळूण तालुक्यात १ लाख ४८ हजार ३०७ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी ३८६ मे. टन तांदूळ व २७४ मे. टन गहू, संगमेश्वर तालुक्यात १ लाख २३ हजार ९४७ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी ३६३ मे. टन तांदूळ व २४७ मे. टन गहू

रत्नागिरी तालुक्यात २ लाख ५ हजार ६३१ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी ५१४.५० मे. टन तांदूळ व ३८३ मे. टन गहू, लांजा तालुक्यात ६५ हजार ९४ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी १७९ मे. टन तांदूळ व १०४ मे. टन गहू, राजापूर तालुक्यात १ लाख ५ हजार ५७ प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी २४२ मे. टन तांदूळ व १९६ मे. टन गहूचे वितरण करण्यात आले आहे. फेब्रुवारीसाठी प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांकरिता धान्याचे वितरण प्रति व्यक्ती ५ किलो याप्रमाणात करावयाचे असून त्यामध्ये प्राधान्य तांदूळ ३ किलो व गहू २ २ किलो असे असेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 06/Jan/2026