उद्योगधंद्यासाठी मेहनत, चिकाटी व सातत्य आवश्यक : गौरांग आगाशे

रत्नागिरी : व्यवसायासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी व सातत्य आवश्यक असते, असे प्रतिपादन उद्योजक गौरांग आगाशे यांनी केले. शहरातील सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम ३ जानेवारी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशालेत हस्तकला व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंचे, तसेच चित्रकला स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. अतिथी गौरांग आगाशे व मुख्याध्यापिका संजना तारी यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती आणि संस्थापका कै. मालतीबाई जोशी, कै. बाबूराव जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यार्थिनींनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. हार्मोनियम साथ श्रीनिवास नाटेकर व तबला साथ भागेश लिंगायत यांनी उत्कृष्ट साथ दिली.

प्रास्ताविकात मुख्याध्यापिका तारी यांनी केले. त्यांनी प्रशालेच्या शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेतला. प्रमुख अतिथींची ओळख स्नेहल पावरी यांनी करून दिली. तारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. वार्षिक अहवाल वाचनात ज्येष्ठ शिक्षक राजेश कांबळे यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली.

यानंतर प्रमुख अतिथी आगाशे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी साहिल देवरुखकर, आस्था बहुतुले, सिद्धी बारगोडे, ओम खेडेकर, आर्यन चव्हाण, दूर्वाग शेलार, आर्या दरडे, अथर्व राडीये, मनस्वी ठीक, आलिशा कोळंबेकर, श्रेया तुळसकर, निधी शेवगण, श्रेया पांगारकर, गौरी परब, तसेच भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्तायादीत प्रथम क्रमांक मिळविणारी आदिती सागवेकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी गौरांग आगाशे यांनी विद्यार्थ्यांना कौशल्याधारित मार्गदर्शन केले. इयत्ता पाचवीचा विद्यार्थी कियांश गोरीवले याने सादर केलेला छत्रपती संभाजी महाराजांचा अभिनय विशेष आकर्षण ठरला. सांस्कृतिक विभागप्रमुख अनिल सागवेकर आभार प्रदर्शन यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:08 PM 06/Jan/2026