Rajapur : पाचल रस्त्यावरील खड्डे भरत विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

पाचल : मनोहर खापणे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालय ते सह्याद्री दर्शन (पाचल- रायपाटण) मार्गावरचे खड्डे भरत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. काही दिवसापूर्वी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ओणी-रायपाटण मार्गावर अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. महाविद्यालय ते सह्याद्री दर्शन या मार्गावर असेच काही मोठे खड्डे असल्याने अपघाताची शक्यता होती. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या बाजूला असलेला मुरुम व रस्त्यावरून बाजूल गेलेल्या खडीने हे खड्डे बुजवले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजन विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ विकास पाटील, डॉ. बळवंत दाभाडे प्रा. सुभाष धोंगडे, प्रा. नंदकुमार देवन आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 07/Jan/2026