खेड : खेड येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागाच्यावतीने रोबोटिक्स व इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सहा दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत ऋषिकेश शेंगे यांच्या रोबोनिक्स अटोमेशन सोल्युशन्स कंपनीमार्फत प्राध्यापक व विद्यार्थ्यांना रोबोटिक्स संदर्भातील प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांकडून विविधप्रकारचे रोबो तयार करून घेण्यात आले. कार्यशाळेदरम्यान बेसिक प्रोग्रामिंग, माउंटिंग, थ्री-डी पीसीबी डिझाईन यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध रोबो तसेच पीसीबी बोर्ड तयार केले.
याच कार्यक्रमात किरण साळवी यांनी रोबोटिक्स व आय.ओ.टी.चे औद्योगिक उपयोग यासंदर्भात सविस्तर प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. घरडा येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये रोबोटिक्स, थ्री-डी पीसीबी डिझाईन, ३डी प्रिंटिंग व आयओटी तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक प्रयोगशाळा विकसित करण्यात आली आहे. रोबोनिक्स अटोमेशन सोल्युशन्स यांच्या उपक्रमातून ही अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. याठिकाणी इतर अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थीही कार्य करू शकतील, असे प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन विभागप्रमुख डॉ. सचिन खेडेकर यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 07/Jan/2026














