रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धेत शहरातील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या पुरुष व महिला संघाने १ सुवर्णपदक, १ रौप्यपदक आणि २ कांस्यपदके प्राप्त केले. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने मुंबई विद्यापीठ महिला तायक्वांदो स्पर्धा २०२६चे सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले.
मुंबई विद्यापीठ आणि चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला आंतरमहाविद्यालयीन पुरुष व महिला तायक्वांदो स्पर्धा २०२६चे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत महाविद्यालयाच्या महिला संघात श्रुती चव्हाण (५४ कि. ग्रॅम.) सुवर्णपदक; समर्था बने (४६ ते ४९ कि. ग्रॅम.) रौप्यपदक, तर सई सावंत (+ ७३ कि. ग्रॅम.); पार्थ गावडे (५४ ते ५८ कि. ग्रॅम.) या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तसेच पुरुष संघातील सुजल सोळंके (६८ ते ७४ कि. ग्रॅम) याने कांस्यपदक, देवेन सोपल (५४ कि. ग्रॅम.) याने कांस्यपदक प्राप्त केले. महाविद्यालयाच्या पुरुष व महिला तायक्वांदो संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, प्रशिक्षक शाहरूख शेख, प्रा. कल्पेश बोटके यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे महाविद्यालयातर्फे अभिनंदन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 07/Jan/2026














