अंगारकी चतुर्थीनिमित्त मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदत केंद्राने किरकोळ आजारांवर केले तत्काळ उपचार

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्यावतीने मंदिर परिसरात वैद्यकीय मदत केंद्र उभारण्यात आले होते. या मदत केंद्रामध्ये भाविकांची आरोग्य तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच किरकोळ आजारांवर तात्काळ उपचार करण्यात आले. उष्माघात, चक्कर येणे, थकवा, डोकेदुखी आदी तक्रारींवर प्राथमिक उपचार देण्यात आले.

आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क राहून सेवा दिल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी आरोग्य सेवेची उपलब्धता असल्याने कोणतीही गंभीर घटना घडली नाही. अंगारकी चतुर्थी निमित्त भाविकांच्या सुरक्षिततेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राने केलेली ही व्यवस्था स्तुत्य ठरली.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये साहेब तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी कर्मचारी यांनी या वेळी आरोग्य सेवा दिली. मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या या तत्पर सेवेबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले. अंगारकीच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय मदत केंद्रात सेवा बजवणारे मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱ्यांची प्रशंसा करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 07/Jan/2026