Guhagar : चिखलीत शेळ्या-मेंढ्यांच्या उपबाजाराचे आमदार जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर : तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी पाळीव प्राणी, गुरे -ढोरे, शेळ्या – मेंढ्या यांच्या उपबाजाराचे उद्घाटन चिपळूण-गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चिखली ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपबाजार भरवण्यात आला आहे. चिखली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. मानसी कदम, सामाजिक कार्यकर्ते मंगेश कदम तसेच ग्रामपंचायतच्या सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने मान्यवरांचे शाल, पुषगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी बाजार समितीचे सभापती आणि स्वागताध्यक्ष संदीप सुर्वे, सरपंच सौ. मानसी कदम, गुहागर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश (दादा) सावंत, मधुकर दळवी, हेमंत माने, सौ. स्नेहल बाईत, विजय टाकळे, नैनेश नारकर, पांडुरंग कदम, प्रियांका माने, उपसरपंच सुभाष दळवी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत, रवींद्र आंबेकर, भगवान (दादा) कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला चिखली पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 PM 07/Jan/2026