देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील देवरुख खालची आळी ते बौद्धवाडी जाणाऱ्या पुलावर गांजा ओढणाऱ्या एका तरुणाला देवरुख पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी करण्यात आली. सुकृत श्रीश भोसले (वय ३४, मूळ रा. कांदिवली, मुंबई, सध्या रा. खालची आळी, देवरुख, संगमेश्वर) असे तरुणाचे नाव आहे. त्याच्या विरोधात कॉन्स्टेबल तेजस देशमुख यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, सुकृत भोसले हा सोमवारी सायंकाळी ७:१० वाजण्याच्या दरम्यान खालची आळी ते बौद्धवाडी जाणाऱ्या पुलावर गांजा ओढताना सापडला. त्याच्यावर एन. डी. पी. एस. कायदा १९८५ कलम ८ (क), २७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला गांजा कोणाकडून मिळाला, याचाही शोध आता देवरुख पोलिस घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 07/Jan/2026














