Mandangad : भारजा नदीतील गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ

मंडणगड : भारजा नदीपात्रात गाळ व अनावश्यक वाढलेली झुडपे यामुळे अरुंद झालेले नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी गतवर्षापासून सुरू असलेल्या गाळ उपसा मोहिमेचा शुभारंभ माजी पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर व सरपंच साक्षी खांडेकर यांच्या उपस्थितीत झाला.

यावेळी माजी उपसरपंच अल्पेश भोसले, रामचंद्र भोसले, सुरेश भोसले, उदय भोसले, सुभाष भोसले, राजेंद्र भोसले, अशोक बैकर, अनंत घाणेकर, मंगेश जाधव, माजी उपसरपंच अल्पेश भोसले आदी उपस्थित होते. शासनाच्या माध्यमातून पालघर गाव व परिसरातील सुमारे तीन किमी अंतरात भारजा नदीपात्रातील गाळ उपसा व अतिरिक्त झुडुपे काढून नदी पात्र स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

शासनाच्या विविध योजनांची सुरुवात तालुक्यात सर्वात आधी पालघर ग्रामपंचायत हद्दीत होत आहे. याआधी पहिला गावठाण ड्रोन सर्वे पालघर ग्रामपंचायत क्षेत्रात राबविला. तसेच जिल्ह्यातील पहिली सोलर नळ योजना मौजे केळवत व पालघर येथे कार्यान्वित झाली आहे- नितीन म्हामुणकर, माजी पंचायत समिती सदस्य

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:24 AM 08/Jan/2026