Sangameshwar : मठधामापूरच्या सोमेश्वर मंदिरात ९ ते १६ जानेवारी कालावधीत विविध कार्यक्रम

संगमेश्वर : तालुक्यातील मठधामापूर येथील श्री देव सोमेश्वर मंदिर येथे मकरसंक्रांत उत्सवानिमित्त ९ ते १६ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व कला-क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सोमेश्वर-गिरिजा विवाह सोहळा हा या उत्सवातील महत्त्वाचा कार्यक्रम आहे.

९ व १० रोजी तालुका मर्यादित कबड्डी सामने, ११ रोजी सायं. ५ वा. श्री. स. स. काडसिद्धेश्वर स्वामीजी मठधिपती सिद्धगिरी मठ कोल्हापूर यांचे आध्यात्मिक प्रवचन, आरती, महाप्रसाद, १२ रोजी सायं. ९ वा. जिल्हा परिषद शाळा मठधामापूर व स्थानिक मुलांचे गुणदर्शन कार्यक्रम, १३ रोजी पहाटे ५ वा., मंदिरात पूजा व आरती, सायं. ७ वा. देवाला हळद चढविणे, ७.३० वा. महाआरती तसेच रात्री १० वा. श्री जागेश्वर नमन मंडळ परचुरी कळंबटेवाडी यांचे नमन, १४ रोजी पहाटे ६ ते ७ वा. पूजा, आरती, अभिषेक, सकाळी १० वा. भाव-भक्तीगीत गायन व सोमेश्वर-गिरिजा विवाह सोहळा दुपारी ३.१५ वा. संपन्न होणार आहे.

त्यानंतर सायंकाळी ४ वा. महिला मंडळ हळदी कुंकू समारंभ, रात्री १० वा. येथील रंगमंचावर ‘यदा कदाचित’ हे तुफान विनोदी नाटक होणार आहे. श्री सत्यनारायण प्रासाधिक बालमित्र समाज देवरुख खालची आळीचे यशस्वी कलाकार हे नाटक सादर करणार आहेत. १५ रोजी सायं. ४.३० पासून देवीचा गोंधळ, तर १६ रोजी सकाळी ८ ते २ अभिषेक उद्देपन व सायं. ५ते १० महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 AM 08/Jan/2026