Sangameshwar : माळवाशीत १० जानेवारीपासून क्रिकेट स्पर्धा

साडवली : संगमेश्वर तालुक्यातील माळवाशी येथे १० जानेवारीपासून टेनिसबॉल ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ओम साई सेवा मंडळ कडूवाडीने कै. सरपंच वैजयंती करंडे स्मृती चषक स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला २५ हजार ५५५ व चषक, द्वितीय १५ हजार ५५५ व चषक, तृतीय ५ हजार ५५५ व चषक, चतुर्थ ३ हजार ३३३ व चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.

उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांना चषक देण्यात येणार आहे. चार शटकांचे हे सामने ओपन व पंचक्रोशीतील स्तरावर खेळवले जाणार आहेत. कै. पांडुरंग करंडे व कै. शिवराम कडू क्रीडा नगरी माळवाशी कडूवाडी येथे हे सामने १० ते १२ जानेवारी दरम्यान होणार आहेत. अधिक माहितीसाठी महेंद्र कडू, विशाल भडवलकर, जितेंद्र कडू, प्रवीण करंडे यांच्याशी संपर्क साधावा व स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन निनावी देवी क्रीडा मंडळ व कडूवाडी मंडळाने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 08/Jan/2026