दापोली : भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीसपदी धीरज पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष भडवळकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या दापोली तालुकाध्यक्षा व नगरसेविका जयाताई साळवी, दापोली ग्रामीण तालुकाध्यक्ष सचिन होडबे, दापोली शहराध्यक्ष अतुल गोंदकर आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 08/Jan/2026














