जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लांजात भाजपाची बैठक संपन्न

लांजा : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लांजा तालुका भाजपाची बैठक नुकतीच लांजा येथे पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार विनय नातू व रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष तसेच दक्षिण रत्नागिरीचे जिल्हा प्रभारी सतीश मोरे उपस्थित होते. यावेळी त्यांनी चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांचा आढावा घेतला. अशा पध्दतीने या निवडणुकीला सामोरे जावे या संदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, भाजप उत्तर मंडळ तालुका अध्यक्ष विराज हरमले, दक्षिण मंडळ तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, तालुका सरचिटणीस प्रथमेश बेंडल तसेच सरचिटणीस सुनील गुरव, युवा अध्यक्ष प्रशांत कोटकर, युवा अध्यक्ष जयेश माजळकर महिला मोर्चा अध्यक्ष भक्ती शेट्ये, उपाध्यक्ष अनन्या पालकर, तसेच पदाधिकारी अजय गुरव, संजय आयरे, श्रीकृष्ण हेगिष्ट, वाघोजी खानविलकर, अनंत चौगुले, अनिल पन्हळेकर, श्रेयस मुळ्ये, भास्कर खामकर, दिनेश चापडे शारदाताई गुरव, अशोक पाटोळे, मधुकर पालये, महेश डाकवे, संजय चव्हाण, दीपक दाभोळकर, मिलिंद आठल्ये, प्रफुल्ल कांबळे, प्रकाश करंबेले तुकाराम प्रिनदावणकर, दादा ठाकूर देसाई, प्रमोद गुरव, विलास दाभोळकर, निचिकेत पेंढारी आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 08/Jan/2026