रत्नागिरी : जिल्हा कराटे असोसिएशनतर्फे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित कराटे स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत विविध शाळांमधील सुमारे २०० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी शिंदेसेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेविका प्रीती सुर्वे, सायली पाटील, मेधा कुलकर्णी, आफरीन होडेकर, प्रशांत सुर्वे उपस्थित होते. या स्पर्धेसाठी कराटे असोसिएशनचे अध्यक्ष जावेद मिरकर, सचिव सूरज बने, खजिनदार अरुण बेग, सदस्य रितेश बेग, नौशीन कापडी यांनी सहकार्य केले. या स्पर्धेवेळी पंच म्हणून आयान मिरकर, तेजस जाधव, प्रथम बेग, रिया माचकर, प्रेम बेग, दिव्य यादव, ध्रुव बसनकर, स्पर्श लिंगायत, स्पंदन लिंगायत, आराध्या चव्हाण, लक्ष्मी पवार, फातिमा बुड्ये, झैद बुड्ये, श्लोक सावंत, आर्या पवार, कार्तिक राठोड, रोमित घोसाळे यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रशांत जाधव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:54 PM 08/Jan/2026














