रत्नागिरीत ‘वुमन्स कार्निव्हल’चा दिमाखदार शुभारंभ! पहिल्याच दिवशी ग्राहकांची उडाली झुंबड; बक्षीस मिळवण्यासाठी महिलांच्या रांगा

◼️नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन; ४ लाखांची बक्षिसे जिंकण्यासाठी पहिल्याच दिवशी हाउसफुल गर्दी

रत्नागिरी खबरदार | विशेष प्रतिनिधी

➡️ रत्नागिरी : कोकणातील सर्वात मोठे व्यावसायिक प्रदर्शन आणि रत्नागिरीकरांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ‘वुमन्स कार्निव्हल’चा (Women’s Carnival) आज अत्यंत दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ झाला. रत्नागिरी खबरदार आयोजित या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन रत्नागिरीच्या नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे (Shilpa Surve) आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष म्हणजे, उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी कार्निव्हल पाहण्यासाठी आणि खरेदीसाठी रत्नागिरीकरांनी, विशेषतः महिलांनी प्रचंड गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

◼️मान्यवरांचा सन्मान आणि आभार
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी रत्नागिरी खबरदारच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये नूतन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, नगरसेवक निमेश नायर, सौरभ मलुष्टे, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, पूजा पवार आणि मेधा कुलकर्णी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या भव्य आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व प्रायोजकांचे (Sponsors) आभार मानण्यात आले.

१ लाखाच्या पैठणीचे जबरदस्त आकर्षण
यावर्षीच्या कार्निव्हलचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्राहकांसाठी ठेवलेली ४ लाख रुपयांची बक्षिसे! यातही एका भाग्यवान महिलेला चक्क १ लाख रुपये किमतीची रॉयल पैठणी (Royal Paithani) मिळणार असल्याने, ही पैठणी पाहण्यासाठी आणि लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले.

◼️पहिल्याच दिवशी विक्रमी गर्दी
सकाळी १० वाजता प्रदर्शनाचे द्वार उघडताच ग्राहकांची पावले जयेश मंगल पार्ककडे वळली. दुपारपर्यंत ही गर्दी वाढत गेली आणि सायंकाळी तर प्रदर्शनाला जत्रेचे स्वरूप आले होते. विविध स्टॉल्स, खाद्य महोत्सवातील पदार्थांचा सुगंध आणि बक्षिसे जिंकण्याचा उत्साह यामुळे पहिल्याच दिवशी वुमन्स कार्निव्हल हाऊसफुल ठरले आहे.

येत्या तीन दिवसांत ही गर्दी आणखी वाढण्याचा अंदाज असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

📅 कालावधी: ८ ते ११ जानेवारी २०२६ (आजपासून सुरू) 🕙 वेळ: सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत 📍 स्थळ: जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:43 08-01-2026