Chiplun : राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी निवासी शिबिरात बांधला बंधारा

असुर्डे : चिपळूण तालुक्यातील खरवते दहिवली येथील शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे वारेली व पातेपिलवली येथे निवासी श्रमदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव वृद्धिंगत करणे, श्रमसंस्कारांचे महत्त्व जागृत करणे, या उद्देशातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे १३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या शिबिरांचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील, पांडुरंग कदम, रामचंद्र कदम, कृष्णा निवदेकर, दिनेश पुनवत व अनंत गोमाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिबिरामध्ये मानसिक आरोग्य कार्यशाळा, तरुणाईपुढील आव्हाने, भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती, प्रक्रिया उद्योगाचे महत्त्व, संविधानाची ७५वी या विषयांवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातून विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना वनसंवर्धन, जलसंधारण, कृषी व्यवसाय व्यवस्थापनाचा संदेश महाविद्यालयाचे प्रा. पी. बी. पाटील, संतोष कांबळे, निशिकांत पाकळे, महेश घाणेकर, मनाली चोगले, संघजा कांबळे, डॉ. योगिता यादव यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:24 PM 08/Jan/2026