साखरपा येथील रस्ता डांबरीकरण पूर्ण

साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव बाजारपेठेतील साखरपा बसस्थानक ते गिरजा मंदिर रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण झाले, तर गिरजादेवी मंदिर ते कोंडगाव तिठापर्यंत रस्त्याला पडलेले खड्डे भरून पूर्ण करण्यात आले.

गेले कित्येक दिवस रस्त्याच्या दुरवस्थेमुळे व्यापारी आणि ग्रामस्थ धुळीने हैराण झाले होते. या रस्त्याबाबत सातत्याने फक्त चर्चाच होत होत्या. ग्रामस्थ, वाहनधारकांना होणाऱ्या त्रासाची दखल घेऊन आमदार किरण सामंत यांनी केलेल्या सूचनेनुसार व माजी शिक्षण सभापती विलास चाळके यांच्या प्रयत्नातून रवी इन्फ्रा कंपनीकडून साखरपा बसस्थानक ते गिरजा मंदिर अनेक दिवस खराब रस्त्यामुळे त्रस्त झालेल्या साखरपावासीयांना रस्ता डांबरीकरणामुळे दिलासा मिळाला आहे.

रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करण्यात आले. यावेळी माजी सभापती जया माने, जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ओंकार कोलते, बापू शिंदे, साखरपा ग्रामपंचायत प्रभारी सरपंच शशिकांत लिंगायत, कोंडगाव प्रभारी सरपंच श्रद्धा शेट्ये, प्रवीण जोयशी यांनी काम पूर्ण करून घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:33 PM 08/Jan/2026