दापोली नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी व विद्यार्थ्यांनी गोळा केला 1 टन कचरा

दापोली : वनविभाग व कोकण कृषी विद्यापीठातील वनशास्त्र विभागातील एनएसएसचे विद्यार्थी, नगरपंचायतचे स्वच्छता कर्मचारी यांनी शहरात एकत्रितपणे राबवलेल्या स्वच्छता मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोहिमेंतर्गत सुमारे १ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आले.

शहरातील लाल कट्टा, नर्सरी रोड, राखीव वनामधून जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली. विद्यापीठातील वनशास्त्राचे एनएसएसचे विद्यार्थी व नगर पंचायत स्वच्छता कर्मचारी यांच्या मदतीने सुमारे १ टन कचरा, तसेच १२११ किलो प्लास्टिक, काचेच्या बाटल्या जमा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. स्वच्छता केलेल्या ठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून नये, तसेच कचरा घंटागाडीतच द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या अभियास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने अशाच प्रकारचे स्वच्छता अभियान शहरातील अन्य भागात राबवले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी नगर पंचायत स्वच्छता सभापती जया साळवी, नगरसेवक सचिन जाधव, वनपाल रामदास खोत, वनरक्षक विश्वंभर झडे, आत्माराम माने, सुरज जगताप, प्रभू साबणे, किरण घोरपडे आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 08/Jan/2026