खेड : खेड शहरातील रोहिदास नगर परिसरात बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या एका महिलेला खेड पोलिसांनी रंगेहाथ पकडल्याची कारवाई ७ जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आली. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रोहीदास नगर, कोर्टाजवळील शिवतर रोड परिसरात आरोपी महिलेच्या घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत ही कारवाई करण्यात आली.
आरोपी शंकुतला जनार्दन खेडेकर (रा. रोहीदास नगर, खेड) हिने कोणताही परवाना नसताना गावठी हातभट्टीची दारू साठवून ती चढ्या दराने विक्री करण्यासाठी ताब्यात बाळगल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. या कारवाईत पोलिसांनी ५५० रुपये किमतीची सुमारे ५ लिटर गावठी हातभट्टीची दारू कॅनसह जप्त केली आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यातील महिला पोलिस आरती किरण डोंगरे (२८) यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास खेड पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 09/Jan/2026














