देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कोंडये देसाईवाडी वरचामाळा येथे वास्तव्यास असलेले रमेश विनायक देसाई (८२) यांनी मंगळवारी गळफास घेत आत्महत्या केली. आपल्या राहत्या घरी दुपारी ३.३० च्या दरम्याने रमेश देसाई यांनी घरातील माळ्याच्या लाकडी भाल्याला काळ्या रंगाची जाड कापडी पट्टी बांधून गळफास घेतला.
या घटनेची माहिती कोंडये गावचे पोलीस पाटील विजय यशवंत शिंदे यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर संगमेश्वर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची केली. कोणालाही कसलीही पूर्वसूचना किंवा कल्पना न देता त्यांनी अचानक असा निर्णय का घेतला, याबाबत कुटुंबीय, नातेवाईक तसेच ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 09/Jan/2026














