Ratnagiri Gogate-Jogalekar College : ‘गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये उद्या खासगी बँकांसाठी कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन

रत्नागिरी : शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल आणि पुणे येथील ग्लोबल आऊटसोअर्सिंग आणि ट्रेनिंग सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी क्षेत्रातील नामवंत बँकांकरिता १० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेच्या इमारतीत कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये महाविद्यालयातून २०१९ पासून २०२५ पर्यंत कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होऊ शकतात. या कॅम्पस ड्राईव्हबाबत अधिक माहितीकरिता प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. रुपेश सावंत देसाई, ग्लोवल आऊटसोअर्सिंगचे गणेश शहाणे यांच्याशी संपर्क साधावा.

खाजगी बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी या कॅम्पस ड्राईव्ह संधीचा जास्तीत जास्त लाभ करुन घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 09/Jan/2026