खेड एसटी स्टँड शेजारी मटका-जुगार खेळ चालवणाऱ्यावर कारवाई

रत्नागिरी : खेड एसटी स्टँड शेजारी मटका जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ७ जानेवारी रोजी दुपारी १.४५ वा. सुमारास करण्यात आली. भरत आत्माराम उसरे (४८, रा. भडगाव उसरेवाडी, खेड) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात पोलिस कॉस्टेबल शिरीष साळुंखे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित खेड एसटी स्टैंड शेजारी मटका जुगार अंकावर पैसे लावून खेळ खेळवित असताना रंगेहाथ मिळून आला. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ हजार ३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 09/Jan/2026