रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या मध्य मंडळ महिला मोर्चा कार्यकारिणी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी जाहीर केली आहे. पक्षाच्या कार्यालयात जिल्हाध्यक्षांसह तालुका महिला अध्यक्ष सूचिता नाचणकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कार्यकारिणी निवडण्यात आली आहे.
तालुकाध्यक्षपदी सूचिता नाचणकर, उपाध्यक्ष सायली केतकर, सरचिटणीस शिवानी रेमूळकर, सचिव मेघा देवस्थळी, सहसचिव अनुष्का शेलार आणि कोषाध्यक्षपदी सपना सावंत यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारिणीच्या सदस्यपदी मंजिरी चव्हाण, शुभांगी घाणेकर, किर्ती मोडक, धनश्री देसाई, नेत्रा करंदीकर, नम्रता इंगावले आणि वैभवी पालेकर यांची निवड झाली आहे. सर्व महिलांनी संघटीत होवून पक्षाचे काम करूया असे आवाहन जिल्हाध्यक्षा वर्षा ढेकणे यांनी यावेळी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 AM 09/Jan/2026














