रत्नागिरी : महाराष्ट्र पोलिस दलाच्या ‘स्थापना दिन (रेझिंग डे)’ व ‘राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान’ निमित्त रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे ८ जानेवारी रोजी पोलिस मुख्यालय येथील कवायत मैदान येथे विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती कार्यक्रमासाठी रत्नागिरी शहरातील विविध १२ शाळेतील १,००० विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
यामध्ये जोगळेकर महाविद्यालय, दामले विद्यालय, ४. फाटक हायस्कूल, एम.डी. नाईक हायस्कूल, गोदुताई जांभेकर हायस्कूल, पटवर्धन हायस्कूल, शिर्के हायस्कूल, अ. के. देसाई हायस्कूल, जी.जी.पी.एस. हायस्कूल, जोशी हायस्कू ल, पोदार इंटर नॅशनल हायस्कूल इत्यादी शाळंचा समावेश होता. महाराष्ट्र पोलीस दलाच्या “स्थापना दिन (रेझिंग डे)” च्या अनुषंगाने कार्यक्रमाच्या सुरुवातीला रत्नागिरी पोलिस दलाकडून ध्वज संचलन करण्यात आले. तसेच रत्नागिरी पोलिस दलाच्या बँड पथकाकडून विविध धून सादर करण्यात आल्या. त्यानंतर उपस्थित सर्व शालेय विद्यार्थ्यांनी रत्नागिरी पोलिस दलाकडील अत्याधुनिक शास्त्रास्त्रांची माहिती व त्यांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. क्यू.आर.टी पथकाकडून पोलिस कवायत मैदानावर दहशतवाद विरोधी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी-गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी रस्ता सूरक्षा व वाहतूक नियमन या विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करुन उपस्थितांमध्ये जनजागृती केली. रत्नागिरी पोलिस दलाच्या श्वान पथकाकडून श्वानांची विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. तसेच रत्नागिरी जिल्हा तायक्वांदो प्रशिक्षक प्रशांत मकवाना यांनी विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाबाबत उपयुक्त प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील अधिकारी व अंमलदारांनी उल्स्फूर्तपणे रक्तदान केले. महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापना दिन (रेझिंग डे) च्या भुषंगाने रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्य हद्दीमध्ये मिरकरवाडा जेटी येथील भगवती बंदर समोरील समुद्र परिसरात विशेष बोट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील अनेक मच्छीमारी बोटींनी सहभाग नोंदवला होता.
या विशेष बोल रॅलीचा शुभारंभ पोलिस अधिक्षक नितिन बगाटे यांच्याहस्ते करण्यात आला तसेच या मध्ये १५० मच्छीमार बांधव उपस्थित होते. यास कार्यक्रमांकरता अपर पोलिस अधिक्षक बी.बी. महामूनी, उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, पोलिस उपअधिक्षक (मुख्यालय) राधिका फडके, स्थानिक गुन्हे अनवेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितिन ढेरे, शहर पोलिस निरीक्षक विवेक पाटील, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक अश्वनाथ खेडकर व पोलिस अंमलदार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 09/Jan/2026














