Diva-Sawantwadi Trains : दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळेबाबत मोठी अपडेट; गाडी आता १५ मिनिटे सुटणार लवकर!

रत्नागिरी : कोकणातील प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या दिवा-सावंतवाडी या रेल्वेगाडीच्या वेळेबाबत मोठी अपडेट समोर आली असून १२ जानेवारीपासून या गाडीच्या वेळेत बदल करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या या रेल्वे गाडीला दिवा व पनवेल स्थानकावर थांबा दिला जातो. सुधारित वेळापत्रकानुसार १०१०५ डाऊन दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस ही पूर्वीप्रमाणे सकाळी ६:२५ वाजता निघणार नसून, १० ते १५ मिनिटे आधी म्हणजे सकाळी ६ ते ६:१५ दरम्यान दिवा स्थानकातून सुटेल. यामुळे प्रवाशांना पहाटेच दिवा जंक्शन रेल्वेस्थानकावर दाखल व्हावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 PM 09/Jan/2026