वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे

रत्नागिरी : वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या अंमलबजावणी पथकामार्फत नियमितपणे वाहनांची तपासणी केली जाते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात नाताळ व नवीन वर्ष या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. सुरक्षिततेसाठी या दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या वाहनांविरुद्ध विशेष तपासणी अभियान राबविले जाते. या दरम्यान मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या दोषी वाहनांवर व वाहन चालकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई केली जाते.

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण २५५ वाहने तपासण्यात आली. त्यामध्ये ११ वाहने दोषी आढळून आली. यातून १० हजार ५०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या वाहन चालकांची अनुज्ञप्ती १८० दिवसांसाठी निलंबनाची कार्यवाही प्रस्तावित आहे. तपासणी दरम्यान दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाते. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीकोनातून ही तपासणी मोहीम यापुढेही चालू राहणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:26 PM 09/Jan/2026