राजापूर : राजापूर नगर परिषदेच्या नविन कौन्सीलची सर्वसाधारण सभा मंगळवारी होत असून या पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधी गटाकडून व्यूहरचना आखली जात आहे. सत्ताधारी काँग्रेस व उबाठा शिवसेनेकडून शहर विकास आघाडी म्हणून गटाची नोंदणी करण्यात आली असून गटनेतेपदी एड. जमिर खलिफे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर शिवसेना व भाजपा महायुतीकडून गटाची नोंदणी करून गटनेतेपदी एड. राहुल तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर उपगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून उबाठा चे नगरसेवक विनय गुरव यांचे तर स्विकृत नगरसेवक पदासाठी राजापुरातील ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तर महायुतीकडून अद्यापही उपनगराध्यक्ष पदासाठी नाव जाहिर करण्यात आलेले नसून स्विकृत नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
नगर परिषदेत महाविकास आघाडीची सत्ता असून लोकनियुक्त नगराध्यक्षपदासह दहा नगरसेवक आघाडीकडे आहेत. तर महायुतीकडे दहा नगरसेवक आहेत. त्यामुळे दोघांकडूनही प्रत्येकी एका सदस्याची स्विकृत सदस्यपदी वर्णी लागणार आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी महायुती उमेदवार देणार की ही निवडणूक बिनविरोध होणार याबाबतही उत्सुकता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:56 PM 09/Jan/2026














