रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर ते कोकणनगर जाणाऱ्या चार रस्त्यावर गॅस ट्रक आणि दुचाकी यामध्ये अपघात झाला. यामध्ये वृद्ध स्वार जखमी झाला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधाजी पवार (वय ६२, रा. कोकणनगर, रत्नागिरी) वृद्ध जखमी स्वाराचे नाव आहे. काल सायंकाळी कोकणनगरकडे जाणाऱ्या चार रस्त्यावर ही घटना घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधाजी पवार हे रत्नागिरीकडे येत असताना गॅसवाहू ट्रकला दुचाकीने धडक दिली. या अपघातात बुधाजी पवार यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 09/Jan/2026














