Ratnagiri : कुर्धे येथे सार्वजनिक रस्त्यावर मद्यप्राशन दोघांविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी : तालुक्यातील पावस बकालवाडी येथील अंतर्गत रस्ता आणि मौजे कुर्धे येथील अंतर्गत रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांविरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार १७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० ते रात्री ८. २५ वा. कालावधीत करण्यात आली. रवींद्र पांडुरंग पावसकर (४५, रा. पावस बकालवाडी, रत्नागिरी), मंदार कृष्णा शिवगण (३६, रा. गावखडी ब्राम्हणवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. हे दोघेही आपल्याकडे दारू पिण्याचा कोणताही परवाना नसताना सार्वजनिक ठिकाणी दारू पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 19/Jan/2026