रत्नागिरी : शहरानजीकच्या कुवारबाव पुलावर रेल्वेची धडक बसून छिन्नविछिन्न अवस्थेत अज्ञात प्रौढाचा मृतदेह शनिवार १७ जानेवारी रोजी दुपारी ३.५७ वा. सुमारास मिळून आला. दिवा-पॅसेंजर रेल्वेची कुवारबाव ब्रिजवर एका प्रौढाला धडक बसल्यामुळे त्याच्या शरीराचे दोन भाग होवून त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 19/Jan/2026














