राजापुरातून दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज नाही

राजापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी राजापूर तालुक्यातून एकही अर्ज सादर झाला नाही. मात्र येथील निवडणूक कार्यालयातून ४३ अर्ज वितरित झाले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी पंचायत समिती गणासाठी दहा, तर जि. प. गटासाठी तीन अर्ज वितरित झाले होते. दुसऱ्या दिवशी एकूण ४३ अर्ज वितरित झाले आहेत. रविवारी सुट्टी आहे. त्यामुळे सोमवारी किती अर्ज वितरित होतात आणि अर्ज सादर होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 19/Jan/2026