गुहागरात जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणासाठी ३९ उमेदवार रिंगणात

गुहागर : तालुक्यातील पाच जिल्हा परिषद गटासाठी १३, तर १० पंचायत समिती गणासाठी २६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उबाठा शिवसेना, भाजप, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, बळीराज सेना, अपक्षांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे काही ठिकाणची निवडणूक रंगतदार होणार असली तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप-सेना युतीतर्फे असगोली गटासाठी संतोष जैतापकर (शिवसेना), अंजनवेल गणासाठी सारिका दाभोळकर (शिवसेना), राष्ट्रवादी अजित पवार पक्षातर्फे असगोली गटासाठी फरान खान, शृंगारतळी गटातून आतीष हातिसकर, पडवे गणासाठी वसंत किल्लेकर, तळवलीसाठी संतोष जोशी, अंजनवेल गणात भक्ती बने, असगोलीत बळीराज सेनेच्या श्रावणी शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. बळीराज सेनेतर्फे तालुकाप्रमुख अरूण भुवड, काँग्रेसतर्फे तळवली गणासाठी तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज केले आहेत. तालुक्यात पाच जि.प. गटासाठी उबाठा शिवसेना ४, मनसे १, शिवसेना ३, भाजप २, अजित पवार राष्ट्रवादी २, बळीराज सेना १ असे १३, तर १० पंचायत समिती गणासाठी उबाठा शिवसेनेतर्फे १०, भाजपतर्फे ४ शिवसेनेतर्फे ६, अजित पवार राष्ट्रवादी ४, काँग्रेस १, अपक्ष १ असे अर्ज दाखल झाले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 23/Jan/2026