लांजा : लांजा नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवडणूक गुरुवारी दुपारी बिनविरोध पार पडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम सभापतीपदी वैभव जोईल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक ही नुकतीच पार पडली होती. त्यानंतर नगरपंचायतीच्या विषय समित्यांची निवडणूक ही काल गुरुवारी दुपारी पार पडली. या निवडणुकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांनी काम पाहिले.
शिवसेनेची एकहाती सत्ता असलेली ही निवडणूक बिनविरोधपणे पार पडली. यावेळी झालेल्या निवडीमध्ये नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष असलेल्या मिलिंद उर्फ बाबा लांजेकर यांची स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी वैभव जोईल यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी रफिक उर्फ गुल्ल्या नेवरेकर यांची तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ प्रणाली गुरुप्रसाद तेली यांची निवड करण्यात आली.
या निवडी प्रसंगी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष सावली कुरूप तसेच नगरसेविका निधी गुरव, पंढरीनाथ मायशेट्ये, श्रद्धा तोडकरी, सुशीला कांबळे, सिद्धेश भोवड, योगेश कावतकर, प्रांजल यादव, नीलिमा करावजे, वंदना काटगाळकर, साक्षी मानकर, मनोहर बाईत, अनिल गुरव, नेहा राडये आदी उपस्थित होते. विषय समित्यांच्या सभापतीपदी निवड झालेल्या सर्व सभापतींचे आमदार किरण सामंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 23/Jan/2026














