ओटीटी प्लॅटफॉर्मवर संकासुराबाबत आक्षेपार्ह मजकूर प्रसारित: ‘आपलं गुहागर’ सामाजिक व्यासपीठातर्फे पोलिसांना निवेदन

गुहागर : झी५ मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील देवखेळ वेब सीरिजच्या टीझरमधून गुहागरमधील प्रसिद्ध खेळे संकासुराबाबत अपमानकारक व धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे. या बाबत बीएनएस व आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करावा असे निवेदन आपलं गुहागर या सामाजिक व्यासपीठाच्या वतीने गुहागर पोलिस ठाण्यात देण्यात आले आहे.

या निवेदनानुसार, संकासुर हा गुहागर परिसरातील प्राचीन व श्रध्दास्थान असलेला देव असून शिमगोत्सवामध्ये हजारो भाविक त्याची श्रध्देने उपासना करतात. झी५ मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘देवखेळ’ नावाची वेब सीरिज ३० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून त्याचा टीझर सध्या सोशल मीडियावर प्रदर्शित व मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामधून संकासुराबाबत बदनामीकारक, अपमानकारक व देवत्वाबाबत संभ्रम निर्माण करणारे संवाद दाखवण्यात आले आहेत. त्या व्हिडीओची ऑफिशियल लिंक https://youtu.be/1tJGtvqrEY Q?si=Kv2vivwnDtRXEv-y भावना दुखावल्या आहेत.

त्यामुळे वेब-सीरिज चे प्रोड्युसर झी५ आणि अशी आहे. संकासुराबाबत बदनामीकारक वाक्य जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आलली आहेत. त्यामुळे गुहागर तालुकावासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे वेब-सीरिज चे प्रोड्युसर झी५ आणि दिग्दर्शक चंद्रकांत लता भायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा आणि ट्रेलरचा व्हिडीओ ताबडतोब थांबवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निवेदन देताना अॅड. संकेत साळवी, सोहम सातार्डेकर, अमोल जामसुतकर, अमित कुबडे, सुहास सातार्डेकर, रोहन भोसले, संदीप भोसले, गणेश किर्वे, विलास कांबळे, परत मालप यांच्यासह आपलं गुहागर सामाजिक व्यासपीठाचे सर्व समन्वयक उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 29/Jan/2026