रत्नागिरी : रत्नागिरी आगारासह विविध आगारांतील चालकांनी आपल्या कर्तव्याचे पालन जबाबदारीने करावे, वाहतुकीचे नियम पाळा, बस चालवताना मोबाईल बोलणे टाळावे, अपघातविरहीत सेवा प्रवाशांना द्यावी, विनाअपघात एसटी चालवून प्रवाशांना सुरक्षित सेवा द्यावी, असे आवाहन विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद यादव यांनी रत्नागिरीतील आयोजित कार्यक्रमात चालकांना केले.
रत्नागिरी आगाराच्या वतीने नुकतेच एसटी बसस्थानकात चालक दिन साजरा करण्यात आला. यावेळी वर्षभर एसटीच्या माध्यमातून प्रवाशांना अविरतपणे चांगली सेवा देणाऱ्या चालकांचा विभागीय नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पुष्पगुच्छ, मिठाई देवून सत्कार करण्यात आला. यावेळी यादव बोलत होते. यावेळी आगार व्यवस्थापक बालाजी अडसुळे, संदीप पाटील व आगारातील चालक, वाहक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 AM 04/Feb/2026














