Ratnagiri : जवाहर नवोदय विद्यालय ७ फेब्रुवारी रोजी प्रवेश परीक्षा

रत्नागिरी : इयत्ता नववी व अकरावी मधील रिक्त जागांच्या प्रवेशासाठी नवोदय विद्यालय परीक्षा ७ फेब्रुवारी रोजी पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, पडवे, (ता. राजापूर) या परीक्षा केंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून घेउन परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० वाजता आपली उपस्थिती नोंदवावी. प्रवेशापत्राशिवाय कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही याची सर्व विद्यार्थी व पालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय प्राचार्य एस. बसवराज यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:47 PM 04/Feb/2026