कोंडकारुळ गणात प्रणव पोळेकरांचा झंझावात; तरुण नेतृत्वाच्या प्रचाराने विरोधकांसमोर उभं केलं मोठं आव्हान

कोंडकारुळ (गुहागर): कोंडकारुळ पंचायत समिती गणामध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीत महायुतीचे तरुण, कर्तृत्ववान आणि विकासाभिमुख उमेदवार प्रणव पोळेकर यांनी प्रचारात घेतलेली मुसंडी आता एका मोठ्या झंझावातात रूपांतरित होताना दिसत आहे. अवघ्या काही दिवसांच्या प्रचारात पोळेकर यांनी गणातील जनतेशी थेट नातं जोडल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.

तरुणाईचा जोश आणि स्पष्ट विचारसरणी

प्रणव पोळेकर यांच्या प्रचारात तरुणाईचा मोठा सहभाग पाहायला मिळत आहे. त्यांचा जोश, स्पष्ट विचारसरणी आणि कामाची जबरदस्त तयारी याचा मोठा प्रभाव मतदारांवर पडत आहे. वाड्यावाड्यांवर होणाऱ्या भेटीगाठींमध्ये पोळेकर यांना महिला आणि ज्येष्ठांकडूनही मोठा आशीर्वाद मिळत असल्याने महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

विकासाचा विश्वासार्ह चेहरा

केवळ घोषणा न देता नागरिकांच्या प्रत्यक्ष प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन पोळेकर यांच्याकडून दिले जात आहे. घरोघरी जाऊन संवाद साधणे आणि सभांमधून जनमानसातील समस्या मांडणे यामुळे प्रणव पोळेकर हे मतदारांसाठी केवळ एक उमेदवार न राहता ‘विकासाचा विश्वासार्ह चेहरा’ म्हणून पुढे येत आहेत. मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता कोंडकारुळ गणात पोळेकर यांच्या नावाचा करिश्मा दिसून येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:13 04-02-2026