रत्नागिरी : जागतिक कर्करोग दिनानिमित्त ४ फेब्रुवारी रोजी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप तसेच अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विकास कुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केला होता. कार्यक्रमास निवासी बाह्यसंपर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाठ, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (एनएसडी) डॉ. यश प्रसादे, एनएसडी वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम कांबळे, डॉ. सुनील डोखळे, जयश्री शिरधनकर (अधिसेविका) तसेच रुग्णालयातील इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मुख कर्करोग, स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोग यांची कारणे, प्रारंभिक लक्षणे, तपासणीचे महत्त्व, तसेच उपलब्ध उपचार पद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास उपचार यशस्वी होऊ शकतात, याबाबत विशेष भर देण्यात आला. तसेच नियमित तपासणी, आरोग्यदायी जीवनशैली व जनजागृती यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी “कर्करोग मुक्ती व जनजागृती” करण्याची सामूहिक शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 04/Feb/2026














