रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार मार्गदर्शन केंद्र यांच्याद्वारे बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन वार बुधवार 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता राणी लक्ष्मीबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), नाचणे रोड, पो. एमआयडीसी, रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे.
जिल्हयातील सर्व उमेदवारांनी रोजगार संधीचा लाभ घेण्यासाठी त्याची नोंदणी या विभागाच्या www.mahaswayam.gov.in पोर्टलवर करावी. नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. 11 फेब्रुवारी रोजीच्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये या दिवशी मुलाखतीकरीता त्यांचे बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळावामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास कृपया कार्यालयाकडे त्वरीत संपर्क साधून नोदणी करावी व रोजगार मेळावा / प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्र.सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:09 05-02-2026













