रत्नागिरी ः प्रतिनिधी तालुक्यातील गावखडी-गुरववाडी येथून विवाहिता बेपत्ता झाली आहे. याबाबत पूर्णगड पोलिस ठाण्यात खबर देण्यात आली आहे. काव्या शुभम गुरव (26,रा.गावखडी,गुरववाडी,रत्नागिरी) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
शनिवार 31 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वा.सुमारास काव्या गुरव ही घरातून तळ्यावर कपडे धुण्यासाठी जाते असे सांगून बाहेर पडली होती. परंतू सायंकाळी उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. तिच्या नातेवाईकांनी तिचा आजूबाजूला शोध घेउन अखरे सोमवार 2 फेब्रुवारी रोजी पूर्णगड पोलिस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याबाबत खबर दिली. काव्याचे वर्णन पुढील प्रमाणे आहे. वर्ण-गोरा,चेहरा गोल,नाक सरळ,डोळे काळे उंची 5 फूट 5 इंच,बांधा सडपातळ,केस काळे, अंगात पिवळ्या रंगाचा टॉप व नेसणीस सफेद लेगींज,मानेस मागील बाजूस शुभम मराठीमध्ये गोंदलेले आहे. डाव्या हातावर मनगटाजवळ शुभम हे इंग्रजित गोंदलेले आहे. या विवाहितेचा सुगावा लागल्यास अगर मिळून आल्यास नागरिकांनी पूर्णगड पोलिस ठाणे फोन नं 02352-237333 किंवा 8767895589 या वर संपर्क साधावा असे आवाहन पूर्णगड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:23 06-02-2026













