Ratnagiri Election: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांचे संचलन

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाकडून ७ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने संचलन केले.कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे उद्देशाने रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचलन करण्यात आले.

समाजकंटक व कायदाभंग करणाऱ्यांना कडक संदेश देण्यात आला. निवडणुकीच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश या संचलनाने दिला.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन पार पडले. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रमुख, पोलीस अंमलदार, दंगल नियंत्रण पथक (आर.सी.पी.), एस.आर.पी.एफ. कंपनीचे अधिकारी व अंमलदार तसेच होमगार्डच्या जवानांचा सहभाग होता.

दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी – १) अधिकारी – ८६, २) पोलीस अंमलदार – १,५३५, ३) होमगार्ड – १,८५३, ४) एसआरपीएफ- २ कंपनी (३ अधिकारी व १८० अंमलदार), ५) आरसीपी प्लाटून – २ (७० अंमलदार) असा बंदोबस्त नेमण्यात आलाय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 07-02-2026