Mandangad: वणंद, आंबडवेत माता रमाई जयंती उत्साहात साजरी

मंडणगड: ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)’ तालुका मंडणगडच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी, त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांची १४८ वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने दापोली तालुक्यातील वणंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

राज्यातून अनुयायांचा महासागर

माता रमाई जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यासाठी केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्यभरातून हजारो अनुयायांनी हजेरी लावली होती. रिपाइं जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे यांच्या नेतृत्वाखाली या भव्य कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. सलग चौथ्या वर्षी हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.

प्रबोधनात्मक कव्वालीचा जंगी सामना

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला कव्वालीचा कार्यक्रम. यामध्ये प्रसिद्ध गायक विजय खैरे विरुद्ध गायिका तेजस्वी कांबळे यांच्यात प्रबोधनात्मक कव्वालीचा जंगी सामना रंगला. या माध्यमातून माता रमाईंच्या जीवनातील त्याग आणि संघर्षाचा प्रवास गाण्यांमधून मांडण्यात आला.

अनुयायांसाठी विशेष सोयी-सुविधा

दूरवरून येणाऱ्या अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी आयोजकांनी चोख व्यवस्था केली होती:

  • अल्पोपहार: मंडणगड-दापोली फाटा (भिंगलोली) येथे मोफत अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
  • वैद्यकीय मदत: आपत्कालीन परिस्थितीसाठी प्राथमिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

“दापोलीत येणाऱ्या अनुयायांची गैरसोय होऊ नये, या उद्देशाने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम सुरू केला आहे. लोकश्रय मिळत आहेच, पण भविष्यात शासन आणि प्रशासनाकडूनही या उपक्रमाला अधिक पाठबळ मिळणे आवश्यक आहे.” – आयोजक समिती

यांनी घेतले विशेष परिश्रम

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दलितमित्र दादासाहेब मर्चंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदेश मर्चंडे, नागसेन तांबे (तालुका अध्यक्ष), रुपेश मर्चंडे, संदेश खैरे, रामदास खैरे, विजय खैरे, किरण पवार, भगवान खैरे, जितेंद्र जाधव, सुरेश तांबे, शंकर पवार, विनोद कवडे, सुशांत खैरे, संकेत तांबे, विधान पवार, संकेश कासारे आणि गौरव मर्चंडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 09-02-2026