५ वेळा वाहतूक नियम मोडल्यास ड्रायव्हिंग लायसन्स कायमचे होणार रद्द !

रत्नागिरी: रस्ते अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात (Motor Vehicle Act) मोठा बदल केला आहे. आता एका वर्षात पाचवेळा वाहतूक नियम मोडल्यास संबंधित वाहनाचे रजिस्ट्रेशन आणि चालकाचा परवाना (License) कायमस्वरूपी रद्द केला जाणार आहे.

नव्या नियमावलीत काय आहे?

  • या चुका पडणार महाग: सीटबेल्ट न लावणे, ओव्हरस्पीडिंग, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे आणि सिग्नल तोडणे यांसारख्या चुकांची नोंद सिस्टीममध्ये केली जाईल.
  • पाचवी चूक शेवटची: वर्षभरात चार वेळा चुका माफ केल्या जातील, मात्र पाचव्या चुकीनंतर थेट परवाना रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • ४५ दिवसांची मुदत: ई-चलन जनरेट झाल्यानंतर दंड भरण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी मिळेल, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल.
  • अपीलची संधी: कारवाई चुकीची वाटल्यास चालकाला त्याविरुद्ध अपील करण्याची संधी दिली जाईल, मात्र चूक सिद्ध झाल्यास दंड भरावाच लागेल.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे बेशिस्त वाहन चालकांना चाप बसेल आणि रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 09-02-2026