रत्नागिरी : राज्यात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने होणारी विक्री रोखण्यासाठी आता प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. गुटखा तस्करी करणाऱ्या टोळ्यांच्या मुख्य सूत्रधारांवर आता थेट मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
कठोर कारवाईचा इशारा:
गुन्हा अजामीनपात्र: अन्न सुरक्षा कायद्यातील त्रुटींमुळे आरोपी सुटत होते, मात्र मकोकामुळे आता हा गुन्हा अजामीनपात्र होणार आहे.
मालमत्ता जप्ती: दोषी सिद्ध झाल्यास आरोपींची अवैध मार्गाने कमावलेली मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत.
कठोर शिक्षा: दोषींना ५ वर्षांपासून ते जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आणि ५ लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
नो गुटखा झोन: शाळा आणि महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग करडी नजर ठेवणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:18 09-02-2026














