Ratnagiri : बारावी व दहावी परीक्षेसाठी समुपदेशकांची नियुक्ती; पाहा हेल्पलाईन क्रमांक

रत्नागिरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावी आणि दहावीच्या परीक्षा आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांवर असणारे मानसिक दडपण आणि भीती दूर करण्यासाठी राज्य मंडळाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य स्तरावरून १० विशेष समुपदेशकांची (Counselors) नियुक्ती करण्यात आली आहे.

परीक्षांचे वेळापत्रक:

  • बारावी परीक्षा: १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६.
  • दहावी परीक्षा: २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६. हे दोन्ही पेपर पुणे, नागपूर, मुंबई, कोकण यांसह सर्व नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतले जाणार आहेत.

समुपदेशनाची गरज का?

परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या ओझ्यामुळे किंवा निकालाच्या भीतीने नकारात्मक विचारांच्या आहारी जातात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी हे समुपदेशक ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करतील.

हे आहेत समुपदेशकांचे संपर्क क्रमांक:

विद्यार्थी आणि पालक खालील मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधून विनामूल्य सल्ला घेऊ शकतात: १. 9960644411 २. 7972573742 ३. 9834084593 ४. 9359978315 ५. 8169202214 ६. 9371661255 ७. 7208429381 ८. 7709156068 ९. 8421150528 १०. 9404783996

महत्त्वाची नियमावली:

  • वेळ: हे समुपदेशक परीक्षेपूर्वी आणि परीक्षेच्या काळात सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत उपलब्ध असतील.
  • नियम: हे क्रमांक केवळ मानसिक आधार आणि मार्गदर्शनासाठी आहेत. परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था किंवा हॉलतिकिटाशी संबंधित तांत्रिक प्रश्नांसाठी या क्रमांकावर फोन करू नये, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:30 09-02-2026