पुण्यातील राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’चा डंका; ५ खेळाडूंनी कोरली पदकावर नावं

​रत्नागिरी | प्रतिनिधी : पुणे येथे ७ आणि ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या ‘ट्रायक्वा राज्यस्तरीय जलतरण चॅम्पियनशिप’ मध्ये रत्नागिरीच्या ‘महेश मिलके स्विमिंग ग्रुप’ च्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत रत्नागिरीच्या ५ खेळाडूंनी अव्वल ३ क्रमांकांमध्ये स्थान पटकावत पदकांची कमाई केली, तर इतर खेळाडूंनी ‘टॉप ८’ मध्ये स्थान मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

​विजेत्या खेळाडूंची देदीप्यमान कामगिरी:
​हे सर्व खेळाडू राष्ट्रीय प्रशिक्षक श्री. महेश मिलके यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. पदविजेत्या खेळाडूंचा तपशील खालीलप्रमाणे:निधी भिडे १४ वर्षांखालील ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक व बटरफ्लाय (द्वितीय – रौप्य), २०० मी. व ५० मी. फ्रीस्टाईल (चौथा क्रमांक)
योगेंद्र तावडे १७ वर्षांखालील ५० मी. फ्रीस्टाईल (द्वितीय – रौप्य), ५० मी. बटरफ्लाय (चौथा क्रमांक)
सानवी पवार १७ वर्षांखालील ५० मी. फ्रीस्टाईल (तृतीय – कांस्य), ब्रेस्टस्ट्रोक, बटरफ्लाय व बॅकस्ट्रोक (चौथा क्रमांक)

अधिश जाधव ७ वर्षांखालील ५० मी. बटरफ्लाय (तृतीय – कांस्य)
अर्णव पिळणकर ११ वर्षांखालील बटरफ्लाय (तृतीय – कांस्य), ५० मी. बॅकस्ट्रोक (चौथा क्रमांक)या व्यतिरिक्त, आरोही पिळणकर आणि शौर्य राऊत यांनी देखील आपापल्या वयोगटात उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्य स्तरावरील ‘टॉप ८’ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

​रत्नागिरीतून कौतुकाचा वर्षाव
​एकाच स्पर्धेत पाच खेळाडूंनी राज्य स्तरावर पदके मिळवून रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल पालक आणि क्रीडाप्रेमींकडून महेश मिलके स्विमिंग ग्रुपवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खडतर सराव आणि महेश मिलके यांचे अचूक मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

​रत्नागिरीतील हा एकमेव असा जलतरण समूह ठरला आहे, ज्याच्या ५ खेळाडूंनी राज्य स्तरावर एकाच वेळी पहिल्या तीन क्रमांकात स्थान पटकावले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 10-02-2026