रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील थकबाकीदारांकडून मालमत्ता कर वसुलीसाठी नगर परिषदेच्या वसुली पथकाने जप्तीची मोहीम सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात मोठ्या रकमेची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांना जप्तीच्या नोटीस बजावण्यात येणार आहेत.
वसुलीचे उद्दिष्ट आणि कडक पावले
- नगर परिषदेने यावर्षी १५ कोटी ७० लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट ठेवले असून त्यापैकी ६ कोटी ६५ लाख रुपये (४३ टक्के) वसुली पूर्ण झाली आहे.
- अजूनही ५७ टक्के वसुली शिल्लक असल्याने प्रशासनावर दबाव आहे.
- कमी रकमेची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांच्या नळजोडण्या तोडण्यात येणार आहेत.
- शासनाकडून कडक सूचना असल्याने वसुलीसाठी कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे वसुली विभाग अधिकारी नरेश आखाडे यांनी स्पष्ट केले आहे.
वले जातात आणि पालकमंत्र्यांनी दिलेल्या ‘विकास’ शब्दाची पूर्तता करण्यासाठी निधीचे वाटप कसे केले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 11-02-2026













